The Inspiration behind our existence
Nurtured by the Compassionate Vision
Shri Chandrakant dada Patil
Hon Cabinet Minister Of Maharashtra State
Higher & Technical Education
Parliamentary Affairs
स्वामी विवेकानंदांनी देशातील तरुणांना उद्देशून 'उठा, जागे व्हा.... आणि ध्येय प्राप्ती होत नाही; तोवर थांबू नका', असा मंत्र दिला. कारण समर्थ समाज घडवण्यासाठी त्या समाजतील तरुण वर्ग, युवापिढी सक्षम, साक्षर आणि निरोगी असणे महत्त्वाचे आहे. आणि आजचा युवक, तरूण पिढी हिच उद्याचा भावी, सुजाण नागरिक आहे. त्यामुळे युवा अवस्थेमध्ये प्रत्येक तरूणाने स्वतःच्या अवतीभोवती असलेल्या समाज जीवनातील वास्तवास समजून घेण्याची आवश्यकता आहे.
हे समजून घेऊन आणि समाजाची गरज ओळखून काम करण्यासाठी ..... वर्षांपूर्वी समर्थ युवा फाऊंडेशनची स्थापना झाली. या संस्थेच्या उभारणीत मला खारीचा वाटा उचलता आला याचा मला आनंद आहे. कारण निरोगी आणि सुदृढ समाजासाठी काम करणे;० हेच माझेही जीवन ध्येय आहे. आणि यासाठी मी नेहमीच टोकाचा आग्रही असतो. आरोग्य क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने जेव्हा संस्थेची संकल्पना राजेश पांडे यांनी माझ्या समोर मांडली; तेव्हा संस्थेचा उद्देश मला सर्वाधिक भावला. त्यामुळे या कार्यात कशाचीही कमतरता पडू द्यायचे नाही; अशी खूणगाठ मी माझ्या मनाशी बांधली. अन् लोकसहभागातून सर्वतोपरी मदत केली.
संस्थेच्या माध्यमातून जेव्हा 'फिरता दवाखाना' सुरु करण्याची संकल्पना मांडली गेली; तेव्हा मला अधिकच आनंद झाला. कारण या संकल्पनेमध्ये महिलांच्या सर्व प्रकारच्या खर्चिक आरोग्य तपासण्यांसह आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्तींच्या तपासण्या मोफत होऊन, त्यांचे तात्काळ रिपोर्ट मिळतील, अशी व्यवस्था उभी करायची होती. त्यामुळे यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे मी निश्चित केले होते. अन् एखादे विधायक काम करायचे असते, तेव्हा समाज सढळ हाताने मदत करतो; हा माझा आज पर्यंतचा अनुभव आहे.त्यामुळे अद्ययावत सोईसुविधांनी युक्त फिरता दवाखान्याच्या उपक्रमाची संकल्पनेसाठी निधी संकलन सुरू केले; तेव्हा एमएनजीएलची मोलाची साथ मिळाली. एमएनजीएलने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून पहिली मोबाईल मेडिकल व्हॅन उपलब्ध करून दिल्याने; या संकल्पाला गती मिळाली.
या व्हॅनचा आषाढी वारीमध्ये मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. अनेक वारकरी बांधवांची वैद्यकीय उपचाराच्या माध्यमातून सेवा करता आली. पहिल्या गाडीच्या प्रतिसादातून दुसरी मेडिकल व्हॅन देखील सुरु झाली. ही व्हॅन देखील अद्ययावत सोईसुविधांनी युक्त असल्याने समर्थ युवा फाऊंडेशनचा उद्देश सफल होताना दिसत आहे.
वर्तमान स्थितीमध्ये भारतामधील लाखो भारतीय युवक परदेशात शिक्षण, नोकरी वा अन्य व्यवसायांत गुंतलेली आहे. पण दुसरीकडे समाजातील असा देखील एक तरुण वर्ग आहे; जो कशाचीही अपेक्षा न ठेवता,
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. कारण या सर्वांना समर्थ समाजाबरोबरच समर्थ भारत घडवायचा आहे. समर्थ युवा फाऊंडेशनचे स्वयंसेवक हे त्यापैकीच एक आहेत असं मला वाटतं. मी संस्थेच्या सर्व
स्वयंसेवकांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आणि संस्थेने अशीच समाजाची अविरत सेवा करत राहो अशा शुभेच्छा देतो.
धन्यवाद!!!
Shri Rajesh Pande
Chairman, Samarth Yuva Foundation
Chairman, National Yuva Co-operative Society
Advisory Council Member, Savitribai Phule Pune University
Trustee : National Book Festival
Shri Rajesh Pande is a visionary leader and social entrepreneur dedicated to empowering youth and fostering community development. As the Chairman of both Samarth Yuva Foundation and the National Yuva Co-operative Society, he has been instrumental in implementing youth-focused programs that promote education, skill development, and social welfare. His leadership has inspired countless young individuals to become active contributors to society, enhancing their lives and those around them.
In addition to his philanthropic work, Shri Pande serves as an Advisory Council Member at Savitribai Phule Pune University, where his strategic input helps guide the university's initiatives related to social empowerment and youth welfare. With a strong commitment to social change, he continues to champion initiatives that bridge the gap between education, employment, and community service.


Shri Prakash Sahoo
Chairman, Samarth Yuva Foundation
President, National Yuva Co-operative Society
Shri Prakash Sahoo is a prominent leader known for his dedication to youth empowerment and cooperative development. As the Chairman of Samarth Yuva Foundation and the President of the National Yuva Co-operative Society, he works relentlessly to create opportunities for youth to develop their skills and contribute positively to society. His leadership fosters an environment of collaboration, growth, and mutual support among young people across various sectors.
With a strong belief in the power of cooperative societies to bring about sustainable development, Shri Sahoo plays a pivotal role in fostering community-based economic models that benefit the younger generation. His efforts have significantly impacted social structures, creating avenues for youth participation in decision-making processes and sustainable community development.